सांगली दिनांक ८/०३/२०२५:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय
मुंबई यांचेकडील कॉमन मिनिमम प्रोग्राम मार्च-२०२५ नुसार दिनांक ८/०३/२०२५ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज, सांगली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर आयोजित करणेत आले. शिबिराचे अध्यक्ष, मा. ॲड. मुकुंद दाते, निवृत्त न्यायाधीश, सांगली हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्रीमती आर.एस. पाटील, ४थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर सांगली या होत्या. स्त्रियांनी भारतीय राज्यघटनेने त्यांचेकरीता निर्माण केलेल्या कायद्याचे पालन आपले संरक्षणासाठी करणेचे असून त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी व महिलांनी एकमेंकास सहाय्य करावे व आपल्या हक्कांबद्दल जागरुक असावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मा. स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे प्रतिमेस पूजन करुन करणेत आली. सदर कार्यक्रमास श्रीमती. डॉ. पुजा नरवाडकर, प्राचार्या, भारती विद्यापीठ न्यु लॉ कॉलेज, सांगली, ॲड. मुक्ता दुबे, पॅनेल विधीज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली या उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमामध्ये मा. ॲड. धनंजय मद्वाण्णा यांनी सायबर हल्यांपासुन स्त्रियांनी आपले संरक्षण कशा प्रकारे करावे तसेच कोणती काळजी घ्यावी या बद्दल उपस्थितांना संबोधित केले. सदर शिबीरास अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰