भिलवडी (ता. पलूस) : येथील महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. भिलवडी या पतसंस्थेच्या चेअरमन पदी भिलवडीचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा. श्री ऐनुद्दीन (चया) जमादार यांची नुकतीच निवड झाली आहे.
महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या संस्थेच्या चेअरमन पदासाठी सर्वानुमते ऐनुद्दीन जमादार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ऐनुद्दीन जमादार यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्ह्याचे नेते संदीप काटे व सामाजिक कार्यकर्ते नवाज मुल्ला यांनी सत्कार केला. यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰