सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, दिनांक 15 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून समतानगर, मिरजकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता भिमपलास टॉवर्स, शासकीय गोदामालगत, समतानगर, मिरज येथे आगमन व गोखले इन्फ्राडेव्हलपर्स प्रा. लि. व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या भिमपलास टॉवर्स या प्रकल्पातील सदनिकांचे हस्तांतरण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार राजेश (नितीन) देशमाने, संघ कार्यवाह, सांगली जिल्हा यांच्या घरी सदिच्छा भेट, स्थळ – नितीराज, इंद्रधनु कॉलनी, कल्पतरू कॉलनी शेजारी, ओ टु पार्क रोड, मिरज. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व मुक्काम.
रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी सकाळी 8.20 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून म्हाडा कॉलनी मिरजकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता आगमन व केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस योजनेंतर्गत मंजुर सांगली, मिरज व कुपवाड शहर मनपाचे ई-बस टर्मिनस विकसीत करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभास उपस्थिती, स्थळ – स.नं. 9/2+3+4, वार्ड क्र. 3, म्हाडा कॉलनीजवळ (महापालिका ओपन स्पेस),मिरज. सकाळी 9.15 वाजता कार्यक्रम स्थळ येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.15 वाजता क्राई टास्क फोर्स आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सकाळी 10.45 वाजता राखीव. सकाळी 11.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून खणभाग सांगलीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता आगमन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सांगली व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दख्खन जत्रा, 2025 च्या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, खणभाग, सांगली. दुपारी 1 वाजता मिरज येथून कोल्हापूरकडे प्रयाण.