सांगली दि ८ : भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीने विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, अलकाताई वाघमारे यांनी महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. महिलांचे सामाजिक स्थान व महिला उन्नतीसाठी करावे लागणारे प्रयत्न महिलांचे सद्यस्थिती याविषयी आपले विचार व्यक्त केले.
उल्काताई तामगांवकर दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास ते सद्यस्थिती पर्यंत महिलांचे सामाजिक परिवर्तन व महिलांपुरीला आव्हान याविषयी मार्गदर्शन केले. कमलताई खांडेकर यांनी महिलांनी केलेले परदेशातील उठाव व महिला दिन साजरा करण्यासाठी जगातील सुरवात याविषयी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला व सर्वांना मिठाईवाटप करण्यात आली. यावेळी कमलताई खांडेकर, अलकाताई वाघमारे, उल्काताई तामगावकर, यशोधरामाई बळखंडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, संजय कांबळे विशाल कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, हिरामण भगत, सुनील खांडेकर, भारतीताई भगत, प्रियंकाताई धुळे, जयाताई भगत, सुशीला ताई बळखंडे, सुरेखाताई बळखंडे, रेखाताई भगत, छायाताई धुळे, सुमित्राताई बळखंडे, सांची बळखंडे, सुप्रिया भगत यांच्या बरोबर श्रमिक नगरमधील कष्टकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰