भिलवडी वार्ताहर :
भिलवडी दि. २५ : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील चितळे डेअरीला म्हसवड मानदेशी उद्दोगिणी ग्रामीण महिलांच्या साठी फिरते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र मानदेशी फौंडेशनने भेट देऊन चितळे डेअरीच्या उदय ' किरण भास्कर ' या प्रशिक्षणाची माहिती घेतली .
मानदेशी फौंडेशनच्या सुमारे वीर महिलांनी चितळे डेअरीला भेट देऊन प्रशिक्षणाची माहिती घेतली . यामध्ये दुग्ध व्यवसाय कसा करावा दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जनावरांचे संगोपन कसे करावे . चारा ' पाणी ' स्वच्छता याचे नियोजन कसे करावे हि सर्व माहिती देण्यात आली ' मुक्त गोठा संगोपन कसे करावे यासाठी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून चित्रफीत दाखविण्यात आली. मानदेशी फौंडेशनच्या महिलांनी चित्रफीत पाहुण मुक्त गोठा प्रणाली ही शेतकरी हिताची व कमी कष्टात दुग्ध व्यवसाय करीता येतो. याची जाणीव झाली. या सर्व प्रशिकणाची माहिती इतर महिलांच्या पर्यंत पोहचवुन दुग्ध व्यवसाय कसा फायदेशीर आहे. याचे महत्व पटवुन देण्याची ग्वाही मानदेशी फौंडेशनच्या फिल्ड ऑफीसर सौ. शुभांगी साबळे यांनी दिली ' त्या पुढे म्हणाल्या चितळे डेअरीने उदय ' किरण ' भास्कर ' या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन दुग्ध व्यवसाय कसा करावा त्याचे फायदे काय आणि मुक्त गोठा संगोपन कसे करावे याची माहिती आम्हास दिली . आमची संस्था हि सर्व माहिती शेतकरी महिलांच्या पर्यंत पोहचऊन दुग्ध व्यवसाय करावा यासाठी प्रोत्सान करेल . प्रारंभी चितळे डेअरीचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ इंगळे व सी . व्ही . कुलकर्णी यांनी चितळे डेअरीच्या विविध प्रक्षिणांची माहीती देऊन स्वागत व प्रास्ताविक केले . तर मानदेशी फौंडेशनच्या सर्व महीलांना चितळे डेअरीच्या पशु संर्वधन विभाग मार्फत माहीती पुस्तीका देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
भिलवडी : म्हसवड मानदेशी महिला फौंडेशनच्या फिल्ड ऑफीसर शुभांगी साबळे यांचा सत्कार करीताना चितळे डेअरीचे डॉ इंगळे ' डॉ . सी . कुलकर्णी .
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰