ब्ल्यू स्टार सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात पंढरपूर येथे वितरण..
सांगोला : समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेस ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्था पंढरपूर यांचा
सन 2025 चा 'आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार' समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेचे सचिव महेश दत्तू यांनी स्वीकारला.
समर्थ बहुउद्देशीय संस्था ही गेली आठ वर्षे समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था,न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्यसनमुक्त व रोगमुक्त भारत अभियान मार्फत व्यसनमुक्तीदूत व आदर्श व्यसनमुक्ती केंद्र पुरस्कार वितरण ,व्यसनमुक्तीच्या पुस्तकाची निर्मिती केली, दुष्काळामध्ये वाटंबरे व चिनके या गावामध्ये जनावरांसाठी शासनाचा चारा छावणी उपक्रम,साने गुरूजी कथामालेचे आयोजन, आरोग्य शिबिरांचे आयोजन,नोकरी मार्गदर्शन केंद्र, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन,महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे, आरोग्यविमा मार्गदर्शन, व्याख्यानांचे आयोजन अशाप्रकारे संस्थाने समाजातील सर्व क्षेत्रासाठी काम करून एक आदर्श निर्माण केला. या कार्याचा गौरव म्हणून समर्थ संस्थेस हा पुरस्कार प्रदान केला.
यासाठी समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे,उपाध्यक्ष इंद्रजित पवार,मेघश्याम सुरवसे, इकबाल पाटील, शरदचंद्र पवार, लता पाटील न्यूट्रीस्टार समूहाचे प्रमुख प्रदीप कुंभार,प्रल्हाद पाटील, जोतिराम सुतार,संदीप कुंभार,देवदास जाधव,भारत वरुटे,कृष्णात डवंग,उत्तम पाटील,विनायक गुरव,संजय गुरव यांचेसह संस्थेचे सभासद व हितचिंतकांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰