पुणे : राष्ट्रीय सामाजिक,शैक्षणिक, उद्योग व सेवा क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसएबिलीटीज चे अध्यक्ष सहा प्राध्यापक चेतन दिवाण यांना हडपसर येथील महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था, कै. सौ शैलाताई रतन माळी स्मारक समिती व बाचपण वर्ल्ड फोरम पुणे यांच्यासंयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमामध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..
प्रा चेतन दिवाण यांना नुकताच याच महिन्यात सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट श्रीगोंदा च्या वतीने देखील शैक्षणिक व संशोधन कार्यातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे
सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक वि.दा. पिंगळे व साहित्यिक संजय कळमकर यांच्या हस्ते तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ स्मिताताई वाघ, सचिव प्राचार्य रवींद्र वाघ, संस्थापक सचिव रतन माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला..
राष्ट्रीय सामाजिक,शैक्षणिक, उद्योग व सेवा पुरस्कार 2025 साठी यावर्षी प्रा चेतन दिवाण तसेच सौ मेघना झुजाम, सरिता चितोडकर, डॉ सुभद्रा सिन्हा, डॉ रिचा पुरोहित, डॉ अनुजा रेड्डी, डॉ अशोक बालगुडे, आसावरी मुजुमदार, रेश्मा सातपुते, सायली देवरे, अनिल दरेकर, रेखा माळी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील यावेळी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. यावेळी शिक्षक , पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सहा. प्रा चेतन दिवाण यांच्या या पुरस्काराबद्दल कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर पाठक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक करळे, सचिव एम शिवकुमार, सदस्या सौ शिल्पा पाठक, संचालक डॉ महेश ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰