yuva MAharashtra पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत पुणे येथे आजपासून तीन ‍दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत पुणे येथे आजपासून तीन ‍दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा



 

        सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत कृषि महाविद्यालयशिवाजीनगरपुणे येथे दि२५ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजि करण्यात आली आहे. या कार्यशाळेत पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन पुणे  संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर (Profitable) होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापुर्वी पुर्वतयारीबरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक असतेतसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखिल महत्वाचे आहेपिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याची बाब विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभागपुणे यांच्याकडून "पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबतसखोल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजि करण्यात आली आहेया कार्यशाळेमध्ये शास्त्रोक्त पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाचे बारकावे सखोल पद्धतीने समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञप्राध्यापकतज्ञ अधिकारी  अनुभवी पिंजरासंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.  या प्रशिक्षणामध्ये पुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूरसंभाजीनगरबीड परभणी या 8 जिल्ह्यांमध्ये केज प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (PMMSY) अंतर्गत Cage culture योजनेतील सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थीनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२३७५८८२४९८८१६००९५१  ८२०८४१३०११ या क्रमांकावर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰