सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत हे शनिवार, दि. 29 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 29 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता हेलिकॉप्टरने स्वामी रामानंद भारती सहकारी सुतगिरणी, तासगाव हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने अंजनी ता. तासगाव कडे प्रयाण. सकाळी 10.50 वाजता स्व. आर. आर. (आबा) पाटील यांच्या समाधीचे दर्शन, स्थळ - निर्मल स्थळ, अंजनी. सकाळी 11 वाजता अंजनी येथून परशुराम मंगल कार्यालय तासगाव कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता अखिल भारतीय सरपंच परिषद सांगली जिल्हा आयोजित संवाद मेळावा-2025 कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - परशुराम मंगल कार्यालय, कांचन पेट्रोल पंपासमोर, तासगाव-विटा रोड, तासगाव. दुपारी 12.30 वाजता सांगली जिल्हा शिवसेना कार्यकारिणी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, स्थळ - हॉटेल जाई, तासगाव. दुपारी 2 वाजता स्वामी रामानंद भारती सहकारी सुतगिरणी तासगाव हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.