yuva MAharashtra सांगलीत शनिवारपासून दख्खन जत्रेचे आयोजन प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

सांगलीत शनिवारपासून दख्खन जत्रेचे आयोजन प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन



 

        सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कक्षाच्या सूचनेनुसार दि. 15 ते 21 मार्च 2025 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमसांगली येथील मैदानावर सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत दख्खन जत्रा आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अगदी माफक दरात व विविध वस्तू उपलब्ध असल्याने या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

        विभागीय आयुक्त कार्यालय पुणेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाजिल्हा परिषद सांगलीमहिला आर्थिक विकास महामंडळ व कृषि विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दख्खन जत्रा 2025 अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या वस्तूंचे व ग्रामिण भागातील शेतकरी उत्पादनांचे विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रदर्शन विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उमेद बचत गटाअंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. बचत गट उत्पादित माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून महिलांना उत्पादन विक्रीची संधी मिळावी यासाठी उमेद अभियान जिल्हा कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

        या प्रदर्शनामध्ये पुणे विभागातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील बचत गटांचे व गावरान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येत आहेत. पुणे विभागातील प्रत्येक जिल्ह्यामधून 10 स्टॉल्स व सांगली जिल्ह्यातून महिला बचत गटासाठी 60, कृषि विभागास 10 व महिला आर्थिक विकास महामंडळासाठी 20 स्टॉल्स असे एकूण 130 स्टॉल्स उपलब्ध केलेले आहेत. यापैकी 30 स्टॉल जेवणाचे व 100 स्टॉल वस्तूंचे असे नियोजन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातून बांबूच्या वस्तुलाकडी खेळणीसेंद्रीय गूळश्रूम पावडर, खानापूरमधून दगडी वस्तू, आयुर्वेदिक फेस वॉशआटपाडी मधून विविध प्रकारचे मसालेबेकरी प्रोडक्टमिरजमधून हाताने तयार केलेली ज्वेलरी, विविध प्रकारच्या चटण्यावाळवा तालुक्यातून दही धपाटेताकस्सीफ्रुट सॅलेड, नर्सरी गांडूळ खते, मटणताट, पुणे विभागातून सोलापूरी सुप्रसिध्द चटणीतृणधान्यापासून बनविलेले विविध पदार्थ (Milets)स्कूलबॅग, ट्रॅव्हलिंग बॅग, सातारा जिल्ह्यातून मावा केककुळीत पीठसुपलेदर बॅगविविध प्रकारचे बिस्कीटसेंद्रीय ज्वारी व कडधान्येकोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूरी प्पल, चकली, फराळाचे पदार्थ व उसाचा रस, पुणे जिल्ह्यातून लोकरी जेन व घोंगडीहोम अप्लायन्सेन विविध मसाले इत्यादी महिला बचत गटांनी उत्पादित केलेला माल विक्रीस उपलब्ध असणार आहे.

        कृषि विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळाचे द्राक्षेमहिलांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल अगदी माफक दरात उपलब्ध केलेले आहेतजेणेकरुन महिलांना त्यांच्या उद्योग वाढीस चालना व भरारी मिळेल. याशिवाय खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये गावरान मटन चिकनकोंबडी वडे, दम बिर्याणी, भरलं वां, पिठलं भाकरीदही धपाटे, ठेचा आदी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शनास भेट देणाऱ्या लोकांच्या मनोरंजनानाठी खास मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰