४ मार्च ते ११ मार्च या कालावधीत संपूर्ण देशात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. त्या अनुषंगाने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. साखर कारखाना लि. कुंडल येथे सुरक्षा ध्वजरोहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ध्वजरोहन कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. आप्पासाहेब कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारखान्याचे सेफ्टी ऑफिसर विशाल पवार यांच्याकडून आरोग्य व सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.
प्रतिवर्षी कारखान्यांमध्ये सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरुण लाड व चेअरमन शरद लाड तसेच संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सातत्याने झिरो एक्सीडेंट पॉलिसी राबवलेली असून कारखान्यात अपघात न होण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना केली जाते.
याप्रसंगी कारखान्याचे सचिव वीरेंद्र देशमुख, चीफ इंजिनिअर आशिष चव्हाण, चीफ केमिस्ट किरण पाटील, डे. चीफ इंजिनिअर प्रमोद पाटील, चीफ इंजिनिअर बाळासाहेब पाटील, डे. चीफ केमिस्ट सचिन माळी, सिव्हिल इंजिनिअर महादेव माने, डे. कोजन मॅनेजर श्री. संदीप भोजे, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर शिवाजी साळुंखे, स्टोअर किपर उदय लाड, सुरक्षा अधिकारी कुंडलिक लाड व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰