yuva MAharashtra 'बाल आशीर्वाद' योजनाच नाही नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन

'बाल आशीर्वाद' योजनाच नाही नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे महिला व बाल विकास कार्यालयाचे आवाहन



        सांगलीदि. 28 (जि. मा. का.) : समाजमाध्यमाव्दारे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना शी योजना असल्याचे भासवून संदेश प्रसारित होत आहेतमहिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नाही. सदर संदेश ही केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये व फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास बुधवले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 

            या प्रकारच्या फसव्या संदेशामध्ये दि. १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यु झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहेअशा कुटुंबातील २ मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा ४ हजार रुपये मिळणार आहेत व त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष / जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावेअसा मजकूर प्रसारित होत आहे. महिला व बाल विकास विभागाची 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत दक्षता बाळगावीअशा अफवा असलेल्या सोशल मिडीया च्या पोस्टवर विश्वास ठेऊ नये, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

            शासन निर्णय दि. ३० मे २०२३ नुसार जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना कार्यान्वित असून या योजनेचा निकषानुसार पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठीचा अर्जाचा नमुना व सोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबतची अधिक माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयसांगली यांच्या अंतर्गत असलेल्या तालुका संरक्षण अधिकारी अथवा जिल्हा बाल संरक्षण कक्षकै. दादू काका भिडे बालगृह/निरीक्षणगृहपुष्पराज चौक, सांगली मिरज रोडसांगली येथे अर्ज करावा. या योजनेसाठी दोन्ही पालक अथवा एक पालक मयत असलेली बालकेवय वर्ष १८ पेक्षा कमी असलेली बालके सद्यस्थितीत शाळेत जात असलेली बालके असे निकष आहेत. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बुधवले यांनी केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰