सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरूवार, दि. 27 मार्च 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 5.35 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. सकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून चिंचणी, ता. तासगावकडे प्रयाण. सकाळी 7.55 वाजता दासनिकेतन, चिंचणी येथे आगमन व माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सकाळी 8.30 वाजता चिंचणी येथून सांगलीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता आगमन व जिल्हा क्रीडा संकुल समिती, सांगलीच्या बैठकीस उपस्थिती, स्थळ - जिल्हा क्रीडा संकुल, वसतिगृह इमारत, सांगली मिरज रोड, सांगली. सकाळी 10.05 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरीय समिती बैठकीस व क्राईम टास्क फोर्स आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. सकाळी 11 वाजता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनु. जाती उपयोजना) 2024-25 आढावा, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे राखीव. दुपारी 1 वाजता मिरज येथून कोल्हापूरकडे प्रयाण.