yuva MAharashtra सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाकरीता मंडळ सदस्य म्हणून नेमणूकीसाठी 10 मे पूर्वी अर्ज सादर करावेत



सांगलीदि. २५ (जि. मा. का.) : माथाडी अधिनियमाच्या कलम अन्वये सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळसांगली या मंडळाकरीता "मंडळगठीत करावयाचे आहे. या मंडळावर "मंडळ सदस्यम्हणून कामगार मालक प्रतिनिधी यांची नेमणूक करण्याकरीता इच्छुक पात्र व्यक्तींनी  दि. 10 मे 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत, असे सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळसांगली चे अध्यक्ष यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमन  कल्याणअधिनियम 1969 अंतर्गत राज्य शासन निर्मित सांगली जिल्हा माथाडी आणि इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमन  कल्याणयोजना 1984  सुधारीत 1992 (कार्यक्षेत्र सांगली जिल्हाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने दि. 22 एप्रिल 2025 रोजीचे पत्रान्वये मा. उच्च न्यायालयाच्या दि. 17 एप्रिल 2025 रोजीच्या प्राप्त निर्देशानुसार, तसेच  सरकारी अभियोक्ता, मा. उच्च न्यायालय मुंबई या कार्यालयाचे दि. 23 एप्रिल 2025 रोजीच्या पत्रास अधिन राहून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासनाच्या दि22 एप्रिल 2025 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने "मंडळ सदस्यम्हणून काम करण्याकरीता इच्छुक असलेले तसेच मंडळाचे अनुसुचित उद्योगातील नोंदित  कार्यरत कामगार / कामगार संघटना व मालक यांनी त्यांचे अर्ज / नामनिर्देशन, त्यांचे संपूर्ण नाव, वय, पत्ता व चारित्र्य पडताळणी दाखला तसेच माथाडी क्षेत्रातील कार्य, अनुभव इत्यादी दि. 10 मे 2025 रोजी पर्यंत मंडळास  प्लॅाट नं. 94 सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या समोरपद्मभूषण वसंतदादा पाटील मार्केट यार्डसांगली- 416416 या पत्त्यावर / sanglimathadi@gmail.com या              ई-मेलवर सादर करावेत.  याबाबत काही साशंकता असल्यास मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्र. 864/2025 इतर 8 सलंग्नित याचिकांमध्ये  दि. 17 एप्रिल 2025 रोजी दिलेले आदेश पहावेत. मंडळास प्राप्त झालेल्या अर्ज व शिफारशींमधून योग्य त्या व्यक्तींची निवड करून मंडळ सदस्य पदी नेमणूक करण्याचा अधिकार शासनाकडे राहीलअसे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰