सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सन 2024-25 पासून गोशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गाईंना प्रतिदिन प्रति गोवंश रक्कम 50 रूपये परिपोषण अनुदान देण्याकरीता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 11 पात्र गोशाळांना एकूण 24 लाख 93 हजार रूपयांचे पोषण अनुदान देण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्ह्यात एकूण 19 नोंदणीकृत गोशाळा आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या समितीने गोशाळांची प्रत्यक्ष पाहणी करुन पडताळणी केली. त्यात 11 पात्र गोशाळांची निवड करण्यात आली. यामध्ये 3 वर्षावरील प्रत्येक देशी गाई प्रति दिन रक्कम रु.50/- पोषणासाठी अनुदान जाहीर करण्यात आले. शासनाने गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निधी उपलव्ध करुन दिला आहे. या उपक्रमाअंतर्गत 554 देशी गाईंना माहे जानेवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीकरीता 24 लाख 93 हजार रूपयांचे पोषण अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत थेट संबंधित गोशाळांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰