प्रतिनिधी : अख्तर पिरजादे
पलूस : 31 मार्च 2025 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी या बँकेस रु.6 कोटी 80 लाख रु.नफा झालेची माहिती बँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव यांनी दिली. मार्च अखेर बँकेकडे 6129 सभासद असून बँकेकडे एकूण ठेवी 212 कोटी 50 लाख इतक्या असून कर्जवाटप रू.182 कोटी 08 लाख इतके केलेले असून बँकेचा एकत्रित व्यवसाय 394 कोटी 58 लाख इतका झालेला आहे. गुंतवणूक रु.58 कोटी 45 लाख आहे तसेच बँकेचा नेट एन.पी.ए.0.00 टक्के इतका आहे सी.आर.ए.आर 13.19 टक्के इतका आहे तसेच प्रती कर्मचारी व्यवसाय 8 कोटी 58 लाख आहे. बँकेची थकबाकी 4.02 टक्के इतकी असून बँकेचे भाग भांडवल रु. 5 कोटी 01 लाख इतके आहे. एकूण राखीव व इतर निधी रू.33 कोटी 26 लाख इतका असल्याची माहिती जे के जाधव यांनी दिली. यावेळी चेअरमन सुधीर जाधव म्हणाले बँकेच्या सध्या दुधोंडी, सांगली, पलूस, विटा व कराड येथे पाच शाखा असून पाच शाखा पैकी प्रधान कार्यालयासह चार शाखा स्वमालकीच्या वास्तूत सुरू आहेत. बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची विज बिले स्विकारली जातात. पॅन कार्ड काढणेची सुविधा तसेच आधार पेमेंट मुळे सर्व शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा सर्व शाखामध्ये आहे. एसएमएस सुविधा ग्राहकांना मोफत दिलेली आहे. बँकेला आयएफएससी कोड असल्यामुळे आरटीजीएस व एनईएफटी मुळे त्वरीत फंड जमा होतात. ग्राहकांच्या सेवेसाठी बँकेने कोअर बँकिंग प्रणाली चालू केली असून मुख्य शाखा दुधोंडी येथे एटीएम, कॅश डिपॉझीट मशीन व पासबुक प्रिंटीग मशीन बसवले आहे ग्राहकांना रूपे डेबीट कार्ड मुळे देशभरातील 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त एटीएम मधून पैसे काढता येतात. ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केली आहे, युपीआय सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकिंग व्यवहार करता येतात तसेच लवकरच व्हॉटसअॅप बँकिंग सुविधा ग्राहकासाठी सुरू करीत आहोत अशी माहिती चेअरमन सुधीर जाधव, व्हा. चेअरमन दौलतराव लोखंडे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन हणमंत कारंडे,जनरल मॅनेंजर संभाजी जाधव यांनी दिली. यावेळी संचालक सतीश धनवडे, अमृत नलवडे, सचिन पाटील, महादेव रानमाळे, अजित सूर्यवंशी, अनिल शेवाळे, आप्पाजी चव्हाण, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मॅनेजर हणमंत महाडीक, शाखाधिकारी प्रकाश आरबूने, राजेश नेने, अभिजीत कत्ते, बाबासो जाधव, गणेश जाधव, वसुलीअधिकारी विकास कदम, संताजी जाधव, आयटी विभागाचे अमजद मुजावर, मिलिंद माळी, नेताजी निकम, अशोक जाधव, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰