सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या बाबतीत सन 2025-2030 या कालावधीसाठी सरपंचपदाकरीता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्याकरीता कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰