सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण 696 ग्रामपंचायतींचे अनुसूचित जाती 83 जागा, अनुसूचित जमाती 5 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 188 जागा व खुल्या प्रवर्गासाठी 420 जागासाठी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यापैकी 50 टक्के जागांचे महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील एकूण 696 ग्रामपंचायतींचे सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडतव्दारे निश्चित करण्यासाठी बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित तालुकास्तरावर तहसिलदार यांनी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांचया पर्यवेक्षणाखाली पार पाडण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
सन 2025 ते 2030 साठी तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे -
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰