सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : मुद्रांक शुल्क वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध पावले उचलली असून, नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. शासकीय महसूल वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काटेकोर नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात मुद्रांक शुल्क रक्कम रुपये 342 कोटी यशस्वीपणे वसूल करण्यात आली आहे. सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रभावी वसुली करण्यात आली आहे. कार्यालयाने शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰