सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने महत्वाच्या प्रसंगी कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरीक व व्यवसायिक यांना जाहिर सूचना प्रसिध्द करून रविवार, दि. 6 एप्रिल रोजी रामनवमी व गुरुवार, दि. 10 एप्रिल रोजी महावीर जयंती असल्याने सदर दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने, मटन व चिकन मार्केट तसेच खाजगी मटन व चिकन दुकाने बंद ठेवण्यात यावी असे आदेशीत करण्यात आले होते. या दिवशी प्राणी हत्या करू नये, असे आवाहन देखील महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी केले होते, त्यास मनपा क्षेत्रातील मटण, फिश, चिकन दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने दुकान बंद करून चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰