जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
सांगली दि. 14 (जि.मा.का.) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी एस.टी.स्टॅण्ड सांगली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, पोलीस उपअधीक्षक (शहर विभाग सांगली) विमला एम., पोलीस उपअधिक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, महानगरपालिका उपायुक्ती स्मृती पाटील, माजी नगरसेविका स्नेहल सावंत यांच्यासह महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, तहसिलदार लिना खरात, तहसिलदार अमोल कुंभार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰