पलूस दि 15 : पलूस येथील तहसील कार्यालयात पलूस तालुक्याच्या निवासी नायब तहसीलदार डॉ. आसमा मुजावर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी तहसील कार्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता. पलूस नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक स्वाती आंबी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नगरपालिकेचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
तसेच रामानंदनगर, पलूस, नागराळे, पुणदी येथे ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी रामानंदनगर येथील डॉ.पतंगराव कदम व्यासपीठ येथे ज्येष्ठ विचारवंत व्ही वाय पाटील यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तसेच महात्मा जोतिबा फुले व गौतम बुद्ध यांच्या ही प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच जयसिंग नावडकर,माजी सरपंच प्रशांत नलवडे, आदम पठाण सर,गजानन कडोले, गौतम कांबळे,संदीप वाघमारे,एडवोकेट वाघमारे सुशील गोतपागर अनिल लोंढे, तौहीद मोमीन, आमीर पठाण विनायक कांबळे, रवींद्र संनके यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
नागराळे, पुणदी येथे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. पलूस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्या करिता अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.सर्व शासकीय कार्यालयात बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰