पलूस दि. ०४ : शरद फौंडेशन संचालित शरद आत्मनिर्भर अभियान, पलूस-कडेगाव (जि. सांगली) यांच्यावतीने बुर्ली येथे मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये ४०० हुन अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५० पेक्षा जास्त रुग्णांची सांगली येथे शास्त्रक्रिया पार पडली. या सर्व रुग्णांना उपचारानंतर फेर तपासणीसाठी सुद्धा बोलावण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्णांकडून मिळालेल्या वैद्यकीय सेवेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या व क्रांतिअग्रणीचे अध्यक्ष शरद लाड तसेच फौन्डेशनच्या अध्यक्षा सौ. धनश्री शरद लाड यांच्या संकल्पनेतून घेतले जाणाऱ्या मोफत नेत्र तपासणी आणि उपचार शिबिरात अनेक गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. प्रती महिना किमान एक नेत्र तपासणी शिबीर अभियानाच्या माध्यमातून पलुस व कडेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये घेण्यात येते. तसेच येणाऱ्या रुग्णांची संपूर्ण काळजी अभियानाच्या विभागीय संघटकांच्या माध्यमातून घेतली जाते.
आज समाजातील अनेक घटक वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय योजनांची माहिती व तिथपर्यंत पोहोचणे, ही सामान्य माणसांची मोठी अडचण बनली आहे. याच सर्व बाबी लक्षात घेऊन शरद आत्मनिर्भर अभियानकडून विविध सेवाभावी, समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध शासन स्तरावरील योजना तसेच स्वतः फौन्डेशनच्यावतीने घेतले जाणारे अनेक उपक्रम सर्वसामान्य व गरजू लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून केले जाते.
या शिबिरास सतीश चौगुले, प्रमोद मिठारी, निवृत्ती पाटील, विशाल जाधव, विजय पाटील, विनायक महाडीक, ज्ञानेश पाटील, नागेश पाटील, बी. डी. मिठारी, बबन चौगुले, सम्मेद चौगुले यांसह बुर्ली येथील सर्व कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰