yuva MAharashtra पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन



 

            सांगलीदि. 21 (जि. मा. का.) : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या म्हैसाळ येथील चार महिलांच्या कुटुंबियांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणसंसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हैसाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन एकत्रित सांत्वन केले.




        यावेळी मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ,  दीपक शिंदे-म्हैसाळकरसरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकरदुर्गादेवी शिंदे म्हैसाळकर यांच्यासह चारही मृत महिलांचे कुटुंबिय उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यात मजुरीसाठी गेलेल्या म्हैसाळ येथील रेखा कांबळेभारती कांबळेकांचन कांबळे व राणी वडर या महिलांचा दिनांक 13 एप्रिल रोजी कुची येथे झालेल्या अपघातामुळे मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला.





        या कुटुंबियांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळवून  देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मिरज तहसीलदार यांनी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्यांचा वैद्यकीय खर्चही देण्याचे त्यांनी आश्वासित केले. तसेच मृत महिलेच्या लहान मुलांना त्यांच्या शिक्षणपालनपोषणासाठी आवश्यक मदत करण्यासाठी प्रयत्न करूअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            यावेळी नाना कांबळे, अशोक वडर, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही पहा...


https://youtu.be/gKKeuuPriEM?si=pPrHqvAfiA4W-s7S

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰