yuva MAharashtra श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन

श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात वाहतूक नियमन



 

        सांगलीदि. 5 (जि.मा.का.) : श्रीराम नवमी उत्सव दि. 6 एप्रिल 2025 अखेर सांगली शहरात साजरा करण्यात येणार आहे. याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने सांगली शहरात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये दि. 6 एप्रिल 2025 रोजी 15.00 वाजल्यापासून ते 22.00 वाजेपर्यंत पुढील मार्गावर पोलीस वाहनेअॅम्बुलन्सफायर बिग्रेडया वाहनांखेरीज सर्व वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

 

            मनाई आदेश लागू करण्यात आलेले रस्ते व ठिकाणे काँग्रेस भवन चौक ते राममंदीर चौक जाणारा रस्ताकर्मवीर चौक ते राममंदीर चौक जाणारा रस्तासिव्हील हॉस्पीटल चौक ते राममंदीर चौक जाणारा रस्ता (राममंदीर चौकाकाडे येणारे सर्व जोड रस्ते).

 

पर्यायी वाहतूक मार्ग

             कॉलेज कॉर्नरकडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी कॉलेज कॉर्नर चौक -आपटा पोलीस चौकी काळी खण - पुष्पराज चौकातून वळण घेवून सिव्हील हॉस्पीटल चौक मार्गे शहरात जाता व येता येईल.

 

            सांगली शहरातून मिरजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्टेशन चौक काँग्रेस भवन चौक आपटा पोलीस चौकी - वाहनतळ काळीखण कर्मवीर चौक मार्गे मिरज शहरात जाता व येता येईल,

 

            सांगली शहरातून तासगांवविटा शहराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एस.टी स्टॅन्ड - सिव्हील हॉस्पीटल रोड - कर्मवीर चौकातून डावीकडे वळण घेवून काळी खण आपटा पोलीस चौकी मार्गे तासगांव कडे जाता येता येईल.         

            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰