भिलवडी दि. 12 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त भिलवडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भिलवडी ता.पलूस येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 10 एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, कविता लेखन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच सायंकाळी संविधान प्रास्ताविक वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संविधान अभ्यासक रुपेश करपे सर व राजेंद्र कांबळे सर यांनी काम पाहिले. त्याचबरोबर रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून गजानन
चव्हाण सर यांनी काम पाहिले.
दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, क्रांतीसूर्याला अभिवादन करण्यात आले तसेच सायंकाळच्या सुमारास पंचशील नगर येथील वृद्ध महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलनावरती आजीबाईची करामत नाटिका सादर केली. या कार्यक्रमांतर्गत भीम पोवाडा, भीम गीतांचे गायनी करण्यात आले तसेच बाल भीम अनुयायांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता कलर्स मराठीवरील सुर नवा ध्यास नवा च्या सीजन तीन मधील फर्स्ट रनर अप आणि झी टीव्ही सारेगमप 2022 मधील टॉप 10 मध्ये असलेला राजू नदाफ यांचा कवाली कार्यक्रम होणार आहे.तर रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता एक रात्र निळ्या पाखरांची हा प्रशिक प्रस्तुत भीम रत्न बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम तसेच रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव व विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता अंकलखोप येथून भीमज्योत आणण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ध्वजारोहण, बुद्ध वंदना, प्रतिमापूजन कार्यक्रम संपन्न होणार असून, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न होणार आहे. दुपारी चार वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भिलवडी गावातून सवाद्य व आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. अशी माहिती पंचशील तरुण मंडळ,पी टी एम आयोजकांनी दिली आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰