yuva MAharashtra केतनराज अकॅडमी गोटखिंडी,जवाहर नवोदय निकालात यशस्वी घोडदौड कायम...

केतनराज अकॅडमी गोटखिंडी,जवाहर नवोदय निकालात यशस्वी घोडदौड कायम...







वाळवा दि. ०१ : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील केतनराज स्पर्धा परीक्षा अकॅडमी च्या चार विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली. सोनाक्षी पाटील (गोटखिंडी ), अस्मिता बाबुराव माळी, (येळावी ), आरोही सुहास अरबूने, (दुधोंडी ) अविष्कार सचिन सोनिकर, पेठ वडगाव यांचा यात समावेश आहे.


       या विद्यार्थ्यांना केंद्रशासना मार्फत इ 6 वी ते 12 वी पर्यंत (CBSE बोर्ड ) चे मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर किंवा अन्य उच्चस्तरीय अधिकारी होण्याची त्यांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत.

     सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीचे प्रमुख मार्गदर्शक काशिनाथ नांगरे व सर्व शिक्षक, पालक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील असून सुद्धा गतवर्षा प्रमाणे याही वर्षी चार विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड झाली तसेच आज अखेर 25 मुलांची  नवोदय साठी निवड तसेच NMMS,शिष्यवृत्ती सैनिक स्कुल मध्ये 80 मुलांना यश मिळाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰