yuva MAharashtra 'आपले सरकार' पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

'आपले सरकार' पोर्टलची सेवा पाच दिवस बंद





मुंबई, दि. ८ : 'आपले सरकारपोर्टलची सेवा नियमित व तांत्रिक देखभालीसाठी  १० ते १४ एप्रिल२०२५ अशी पाच दिवस बंद राहील. या कालावधीत 'आपले सरकारसेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाहीयाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावीअसे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त एक दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिकग्रामीण आणि शहरी भागातील 'आपले सरकारकेंद्र चालक, 'सेतूकेंद्र चालकसंबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी कृपया या पूर्वसूचनेची नोंद घ्यावीअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰