समर्थ संस्थेचे यशस्वी उद्योजक घडवूया प्रशिक्षण संपन्न...
समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था, न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेला 'चला यशस्वी उद्योजक घडवूया 'हा तीन दिवसाचा ऐतिहासिक प्रशिक्षण वर्ग महाबळेश्वरमध्ये संपन्न झाला. यावेळी न्यूट्रीस्टार कंपनीचे चेअरमन श्री.प्रदीप कुंभार सर यांनी देशाला व्यसनमुक्त, मधुमेहमुक्त, रोगमुक्त करून आर्थिक बळकटी देण्याचे लक्ष समोर ठेवले. देशातील वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी प्रशिक्षण देऊन प्रत्येक घरात यशस्वी उद्योजक घडविण्याचा ऐतिहासिक पावन नगरीत विडा उचलला.समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी प्रदीप कुंभार साहेबांचे अभिनंदन करून सर्वांनी या राष्ट्रकार्यात त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाचा भार प्रमुख सहकारी व कंपनीचे महाराष्ट्र मार्केटिंग हेड जोतीराम सुतार यांनी यशस्वीरीत्या उचलला.यावेळी प्रसिद्ध उद्योजक विनायक गुरव यांनी उपस्थित राहून प्रेरणा व प्रोत्साहन दिले.सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व जागतिक किर्तीचे गायक प्रल्हाद पाटील यांनी ओघवत्या शैलीत प्रशिक्षनामध्ये उत्साह भरला व आभार प्रमुख संयोजक संदीप कुंभार यांनी मानले.यावेळी प्रमुख सहकारी देव जाधव,भरत वरुटे,कृष्णात डवंग,उत्तम पाटील यांचेसह या प्रशिक्षणाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰