व्हिडीओ
प्रतिनिधी : अख्तर पिरजादे
पलूस दि. २१ : बुर्ली गावचे सुपुत्र रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार यांचे आज 21 /4/ 2025 रोजी दुपारी अपघाती निधन झाले. ते /(बीएसएफ) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये मुख्य आरक्षण या पदावर काम करत होते.
सुट्टी निमित्त ते गावी आले होते जमखंडी येथील सासरवाडीत राहिल्यानंतर ते आज आपल्या बुर्ली गावी यायला निघाले असता जमखंडी जवळच त्यांचा एसटी बस आणि सियाज कार चा अपघात झाला.
यामध्ये रियाज इनामदार यांचे जागीच निधन झाले. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.रियाज इनामदार यांच्यावर बुर्ली येथील दफनभूमी येथे सकाळी 8:00 वा. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे. तरी त्यांचा दफनविधीचा सर्व विधी बुर्ली गावी मंगळवारी सकाळी 22/ 4/ 2025 रोजी सकाळी 8:00 वाजता होणार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बुर्ली गावावर शोककळा पसरली. बुर्ली गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. मंगळवारी देखील बुर्ली गाव दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे असल्याचे सरपंच यांनी जाहीर केले. सैन्य दलात असणाऱ्या आपल्या गावातील तरुणाचे अपघाती निधन झाल्याने गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.रियाज ला अमर या टोपण नावाने ओळखलें जात होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰